A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अप्सरा आली इंद्रपुरीतून

कोमल काया की मोहमाया पुनवचांदणं न्हाली
सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्‍नप्रभा तनू ल्याली
ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली
पसरली लाली रत्‍नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदणी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदणं न्हाली

छबिदार सुरत देखणी जणू हिरकणी नार गुलजार
सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी सोसते भार
शेलटी खुणावे कटि तशी हनुवटी नयन तलवार

ही रति मदभरली दाजी ठिणगी शिणगाराची
कस्तुरी दरवळली दाजी झुळुक ही वार्‍याची

ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली पाहुन थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतुन खाली
पसरली लाली रत्‍नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली चांदणी रंगमहाली
अप्सरा आली पुनवचांदणं न्हाली
कंचुकी - चोळी.
कटि - कंबर.
कस्तुरी - एक अतिशय सुगंधी द्रव्य.
रति - मदनाची पत्‍नी / सुंदर स्‍त्री.
शेलाटी - कृश / बारीक.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  अजय गोगावले, बेला शेंडे, अतुल गोगावले