अप्सरा स्वर्गातून आली
इंद्रधनूच्या कमानीतुनी अवतरली खाली
अप्सरा स्वर्गातून आली
पदन्यास हे झंकाराचे
कोरिव लेणे शृंगाराचे
जणू सांज ही रविकिरणांच्या तेजाने न्हाली
जलवंतीच्या निळ्या दर्पणी
न्याहळसी का तनू देखणी?
नजर बोलता लाज अशी का साज नवा ल्याली?
अनेक रूपी, अनेक रंगी
भासलीस तू सखे शुभांगी
स्वप्नमयूरी आज प्रियाला साद जणू घाली
अप्सरा स्वर्गातून आली
पदन्यास हे झंकाराचे
कोरिव लेणे शृंगाराचे
जणू सांज ही रविकिरणांच्या तेजाने न्हाली
जलवंतीच्या निळ्या दर्पणी
न्याहळसी का तनू देखणी?
नजर बोलता लाज अशी का साज नवा ल्याली?
अनेक रूपी, अनेक रंगी
भासलीस तू सखे शुभांगी
स्वप्नमयूरी आज प्रियाला साद जणू घाली
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | बाळ पळसुले |
स्वर | - | महेंद्र कपूर |
चित्रपट | - | पाटलीण |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
लेणे | - | वस्त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम. |