रान हे उठले उठले
रान हे उठले उठले मुक्त आभाळ झाले
तिच्या नुसत्या चाहुलीने भ्रमर गुंगुनी हे गेले
रान आकाश आकाश भव्य फुलोरा त्याचा
मन सोनुलं सोनुलं वारा विसावे हा आता
सये जाऊ त्या पल्याड पायवाटा ओलांडून
सूर्यास्त हा गोजिरा गेली सखी मोहरून !
जाऊ चालत गाऊन शब्द, याच देखण्या वाटेवरुनी
ये मनोहर छान सुगंध वाटेवरल्या फुलाफुलांतुनी
जीवनातुनी येई बहरसा, जीवनातुनी अशी लहर फुले
बंध हे रेशमी ऐसे, किती दिसांचे दिसांचे
कुणी तोडता तुटेना तुझ्या नि माझ्या संगतीचे !

गीत | - | कौस्तुभ सावरकर |
संगीत | - | अमार्त्य राहूत |
स्वर | - | रवींद्र साठे |
चित्रपट | - | उत्तरायण |
गीत प्रकार | - | चित्रगीत |