अपुले गुपीत सजणा
अपुले गुपीत सजणा
सांगू नको कुणाला
मजला खुणावुनी का
टक लाविसी मुखाला
कानांत सांग माझ्या
जे रंजवी जिवाला
बागेत शांत वेळी
मधुगंध मंद आला
करि चंद्र काय जादू?
हृदयी धरी सखीला
लाभे घडी सुखाची
सहवास गोड झाला
ठेवू लिहून ओठी
हा प्रेमलेख पहिला
सांगू नको कुणाला
मजला खुणावुनी का
टक लाविसी मुखाला
कानांत सांग माझ्या
जे रंजवी जिवाला
बागेत शांत वेळी
मधुगंध मंद आला
करि चंद्र काय जादू?
हृदयी धरी सखीला
लाभे घडी सुखाची
सहवास गोड झाला
ठेवू लिहून ओठी
हा प्रेमलेख पहिला
गीत | - | एस्. एस्. बापट |
संगीत | - | आर. एन्. पराडकर |
स्वर | - | आर. एन्. पराडकर |
गीत प्रकार | - | भावगीत |