मार्ग नसे हा भला
पाऊल चुकले आज तुझे परि माणूस तू चांगला
नकोस राजा चढूस माडी, मार्ग नसे हा भला
खिशात जोवर असेल नाणे
खुषीत रिझविल इथले गाणे
इष्कफुलांचे रोज बहाणे, मत्स्य लागतो गळा
विषयवासना विषमय ओठी
सावज भुलते, हसते कोठी
इथे प्रतिष्ठा ठरते खोटी, आला तो संपला
नकोस राजा चढूस माडी, मार्ग नसे हा भला
खिशात जोवर असेल नाणे
खुषीत रिझविल इथले गाणे
इष्कफुलांचे रोज बहाणे, मत्स्य लागतो गळा
विषयवासना विषमय ओठी
सावज भुलते, हसते कोठी
इथे प्रतिष्ठा ठरते खोटी, आला तो संपला
गीत | - | रजनीकांत राजाध्यक्ष |
संगीत | - | प्रभाकर पंडित |
स्वर | - | शरद जांभेकर, पुष्पा पागधरे |
चित्रपट | - | तुमची खुशी हाच माझा सौदा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
विषयवासना (विषय) | - | कामवासना. |