A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अरसिक किति हा शेला

अरसिक किति हा शेला ।
त्या सुंदर तनुला सोडुनि आला ॥

प्रेमें प्राणपतीला । मीं संतोषें हा अर्पण केला ।
दुर्मिळ जें स्थळ मजला । तें सहज मिळुनि या दुर्भाग्याला ।
तेथुनि कां हा ढळला । त्या सत्संगतिला कैसा विटला ।
कोंडुन ठेविन याला । मज दृष्टिस नलगे निष्ठुर मेला ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वराविष्कार- सुहासिनी मुळगांवकर
बालगंधर्व
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - सौभद्र
चाल-अहा हे कृष्णा मुकुंदा
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुहासिनी मुळगांवकर
  बालगंधर्व