A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अरे देवा तुझी मुले अशी का

अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात?
कुणी एकत्र नांदती, कुणी दूर दहा हात

जातपात पाहुनिया सारा व्यापार ठरतो
मोठेपणा माणसाला का रे जन्मासवे येतो?
कुणी लोळे वैभवात, कुणी पोळतो चिंतेत

नाथाघरचे भोजन सारा गाव पंगतीला
दूधभात सर्वांमुखी आग्रहाने भरविला
थोर संतांच्या या कथा आम्हा सार्‍यांच्या मुखात
गीत - यशवंत देव
संगीत - यशवंत देव
स्वर- सुधीर फडके
गीत प्रकार - भावगीत