अर्जुन तर संन्यासी होउनी
          अर्जुन तर संन्यासी होउनी रैवतकीं बसला ।
झालि सुभद्रा नष्ट असा ग्रह त्याच्या मनिं ठसला ।
वैराग्याचा पुतळा केवळ सांप्रत तो बनला ।
तत्त्वनिष्ठ वेदान्ती होउनि तुच्छ मानितो विषयाला ।
प्राणायामें कुभंक करुनी साधित योगाला ।
सुभद्रेची मूर्ती हृदयीं धरुनि करितसे ध्यानाला ।
ही एक गोष्ट मज अनुकूलचि जाहली ।
कीं ढोंग नसुनि खरि वृत्ति यतिस साधली ।
नासिकाग्र दृष्टी सर्वकाल लागली ।
भोळे अमुचे दादा तेथें जाति दर्शनाला ।
तरी खचित सांगतो तयाच्या लागति नादाला ॥
          झालि सुभद्रा नष्ट असा ग्रह त्याच्या मनिं ठसला ।
वैराग्याचा पुतळा केवळ सांप्रत तो बनला ।
तत्त्वनिष्ठ वेदान्ती होउनि तुच्छ मानितो विषयाला ।
प्राणायामें कुभंक करुनी साधित योगाला ।
सुभद्रेची मूर्ती हृदयीं धरुनि करितसे ध्यानाला ।
ही एक गोष्ट मज अनुकूलचि जाहली ।
कीं ढोंग नसुनि खरि वृत्ति यतिस साधली ।
नासिकाग्र दृष्टी सर्वकाल लागली ।
भोळे अमुचे दादा तेथें जाति दर्शनाला ।
तरी खचित सांगतो तयाच्या लागति नादाला ॥
| गीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर | 
| संगीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर | 
| स्वर | - | |
| नाटक | - | सौभद्र | 
| चाल | - | शिवाज्ञेची वाट न पाहता | 
| गीत प्रकार | - | नाट्यसंगीत | 
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.  | 
| कुंभक | - | प्राण कोंडून धरणें. कुंभक हा एक योगशास्त्रपारिभाषिक शब्द आहे. | 
| यति | - | संन्यासी. | 
| रैवतक | - | गिरनार पर्वत. | 
| विषयवासना (विषय) | - | कामवासना. | 
| सांप्रत | - | हल्ली, सध्याच्या काळी. | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
  
  
  
  
  
  
  
  
  
  










