असा मी काय गुन्हा केला
कळेना अजुनी माझे मला
असा मी काय गुन्हा केला?
हितगूज केले ज्या नयनांनी
त्या नयनांतुनी येई पाणी
दोन जिवांची प्रीत ही रुसुनी
गेली सोडुनी आज अम्हाला
जागे होता घाव अंतरी
नको नको ते येई पदरी
दुःख प्रीतीचे सांगावे तरी
जनरूढीची भीड मनाला
सुखशांतीला फितुर होउनी
दैवही माझे गेले निघुनी
उभी एकटी वेड्यापरी मी
काय विचारू कसे कुणाला?
असा मी काय गुन्हा केला?
हितगूज केले ज्या नयनांनी
त्या नयनांतुनी येई पाणी
दोन जिवांची प्रीत ही रुसुनी
गेली सोडुनी आज अम्हाला
जागे होता घाव अंतरी
नको नको ते येई पदरी
दुःख प्रीतीचे सांगावे तरी
जनरूढीची भीड मनाला
सुखशांतीला फितुर होउनी
दैवही माझे गेले निघुनी
उभी एकटी वेड्यापरी मी
काय विचारू कसे कुणाला?
गीत | - | रमेश अणावकर |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | आशा भोसले |
राग | - | पहाडी |
गीत प्रकार | - | भावगीत |
हितगूज | - | हिताची गुप्त गोष्ट. |