असावा असा सुखी संसार
असावा असा सुखी संसार
आनंदच जणू नांदे घेऊन घरट्याचा आकार
पहाट उठते गुंजत गाणी
गात गात ही दिवेलागणी
आल्या अतिथ्या मूठभर देई, अन्न उदार दुपार
दिसते ते ते येथे निर्मळ
बोल उमटतो तो तो मंजूळ
खिडकीपाशी म्हणून थबकतो वारा वारंवार
धनीण घरची सुरेख हसरी
प्रीत धन्याची फार तिजवरी
उद्योगाने उजेड उजळे, स्वप्न बघे अंधार
आनंदच जणू नांदे घेऊन घरट्याचा आकार
पहाट उठते गुंजत गाणी
गात गात ही दिवेलागणी
आल्या अतिथ्या मूठभर देई, अन्न उदार दुपार
दिसते ते ते येथे निर्मळ
बोल उमटतो तो तो मंजूळ
खिडकीपाशी म्हणून थबकतो वारा वारंवार
धनीण घरची सुरेख हसरी
प्रीत धन्याची फार तिजवरी
उद्योगाने उजेड उजळे, स्वप्न बघे अंधार
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | उषा मंगेशकर |
चित्रपट | - | सोनारानं टोचलं कान |
गीत प्रकार | - | चित्रगीत |