असेंच होतें म्हणायचें तर
असेंच होतें म्हणायचें तर
अशी अचानक भ्यालिस कां?
अर्ध्या वाटेवरती जाउन
पुन्हा परत तूं आलिस कां?
असेंच होतें म्हणायचें तर
वरवर फसवें हसलिस कां?
स्वप्नाला चुरडून मिठींतच
पुन्हा तयावर रुसलिस कां?
असेंच होतें म्हणायचें तर
उगाच खोटे रडलिस कां?
भरात येउन भलत्यासलत्या
करांत माझ्या शिरलिस कां?
असेंच होतें म्हणायचें तर
अशी जिवाला डसलिस कां?
केस मोकळे, ओले घेउन
वणव्यामध्यें घुसलिस कां?
अशी अचानक भ्यालिस कां?
अर्ध्या वाटेवरती जाउन
पुन्हा परत तूं आलिस कां?
असेंच होतें म्हणायचें तर
वरवर फसवें हसलिस कां?
स्वप्नाला चुरडून मिठींतच
पुन्हा तयावर रुसलिस कां?
असेंच होतें म्हणायचें तर
उगाच खोटे रडलिस कां?
भरात येउन भलत्यासलत्या
करांत माझ्या शिरलिस कां?
असेंच होतें म्हणायचें तर
अशी जिवाला डसलिस कां?
केस मोकळे, ओले घेउन
वणव्यामध्यें घुसलिस कां?
गीत | - | विंदा करंदीकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | सुधीर फडके |
राग | - | अभोगी |
गीत प्रकार | - | कविता |
टीप - • काव्य रचना - १० सप्टेंबर १९५२. |