चित्र जयाचे मनी रेखिले
चित्र जयाचे मनी रेखिले
शिवशंकर ते आज पाहिले
ध्यानमयी ते रूप मनोहर
वदनावरचे तेज शुभंकर
स्वप्नच माझे सगुणरुपाने जणू मूर्त जाहले
समीप येता अधीर पाउली
अमृतात ही काया न्हाली
तनूमनाचे भान प्रियाच्या चरणांवर वाहिले
आता दुजेपण कुठे राहिले?
अवघे जीवन शिवमय झाले
या देहाचे बंध तोडुनी अनंतास पर्णिले
शिवशंकर ते आज पाहिले
ध्यानमयी ते रूप मनोहर
वदनावरचे तेज शुभंकर
स्वप्नच माझे सगुणरुपाने जणू मूर्त जाहले
समीप येता अधीर पाउली
अमृतात ही काया न्हाली
तनूमनाचे भान प्रियाच्या चरणांवर वाहिले
आता दुजेपण कुठे राहिले?
अवघे जीवन शिवमय झाले
या देहाचे बंध तोडुनी अनंतास पर्णिले
गीत | - | वंदना विटणकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | माणिक वर्मा |
राग | - | काफी |
गीत प्रकार | - | भावगीत, कल्पनेचा कुंचला, मना तुझे मनोगत |
पर्णणे | - | वरणे / पसंत करणे. |