अशा या सांजवेळेला
अशा या सांजवेळेला, सुखाचा गंध हा आला
रिकाम्या ओंजळीला ह्या फुलांचा भार का झाला
निळ्या पाण्यात चंद्राच्या बिलोरी हालती छाया
निळ्या अंधारलाटेचा किनारा पैंजणे झाला
कुठे त्या गाववेशीला दिव्यांचा कारवा हाले
मनाच्या स्वैर मोराचा पिसारा मोकळा झाला
पहाटे स्वप्नपक्ष्यांनी किनारे झाकले दोन्ही
मिठीच्या वादळाकाठी उसासा चंदनी झाला

| गीत | - | अनिल कांबळे |
| संगीत | - | आनंद मोडक |
| स्वर | - | रंजना जोगळेकर |
| गीत प्रकार | - | भावगीत |
| कारवा | - | तांडा. |
| बिलोरी | - | काचेचे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.

रंजना जोगळेकर