A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नदीकिनारीं माझा गांव

नदीकिनारीं माझा गांव !

ऊन पाऊस शिवेना, मोहाची छाया दाट
आंब्याच्या राईंतुनी गेली माझ्या माहेराची वाट
तिथल्या प्रेमळ आठवणींचा उरीं कोवळा घाव !

किती काढसी श्रावणमेघा, विरतिल पाण्यावरती रेघा
झरझर सरत्या वाळूवरती अजुनि उमटलें नांव

नकळे बाई कुणी वसविला, चराचरांच्या मनीं ठसविला
पैलतिरीं न्यायास एकली प्रभुनांवाची नाव
गीत - राजा बढे
संगीत - गजानन वाटवे
स्वर- भानुमती कंस
गीत प्रकार - भावगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.