A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अशी धरा असे गगन

अशी निशा पुन्हा कधी दिसेल का?
अशी धरा असे गगन सजेल का?

सुरम्य चंद्रबिंब तारकावली
निशा चढे निशेत चोरपाऊलीं
ढगांत चंद्र मग जरा लपेल का?

सुगंध रातराणिचा तरंगतो
प्रशांत धुंद आसमंत पेंगतो
दंवात मग धरा जरा भिजेल का?

विशाल तो कदंब झेली चांदणे
मिठीत भान हरपुनी सुखावणे
अशीच ऊर्मि अंतरीं निवेल का?
कदंब (कळंब) - वृक्षाचे नाव.
निवणे - शांत होणे.

 

Random song suggestion
  पं. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर