अशी कशी घरात झाली
भर दुपारच्या ग प्रहरी
मंडळी असुनी शेजारी
अशी कशी घरात झाली बाई चोरी?
मी घरात होते बसले
मज अंगणात ते दिसले
मी बघता बघता फसले
अन् चोरा पाहुनी हसले
मंडळी असून शेजारी
अशी कशी घरात झाली बाई चोरी?
किती चोराची नवलाई
दादा चोरां सामिल होई
दोघे हातात घालुनी हात
बाबा पुढुनी आले आत
बैसला चोर बाहेरी
अशी कशी घरात झाली बाई चोरी?
मधुहास्य लावुनी चावी
तिजोरी दुरून कशी उघडावी
प्रीतिचा चोरकंदील
नेले चोरुनी त्याने माझे दील
लुटली ऐपत माझी सारी
अशी कशी घरात झाली बाई चोरी?
जरी ऐपत माझी नेली
विसरला इथेच तो अपुली
जरी येईल मागायासी
तरी देईन नच मी त्यासी
डांबीन इथे चौप्रहरी
करावी कशास असली चोरी?
मंडळी असुनी शेजारी
अशी कशी घरात झाली बाई चोरी?
मी घरात होते बसले
मज अंगणात ते दिसले
मी बघता बघता फसले
अन् चोरा पाहुनी हसले
मंडळी असून शेजारी
अशी कशी घरात झाली बाई चोरी?
किती चोराची नवलाई
दादा चोरां सामिल होई
दोघे हातात घालुनी हात
बाबा पुढुनी आले आत
बैसला चोर बाहेरी
अशी कशी घरात झाली बाई चोरी?
मधुहास्य लावुनी चावी
तिजोरी दुरून कशी उघडावी
प्रीतिचा चोरकंदील
नेले चोरुनी त्याने माझे दील
लुटली ऐपत माझी सारी
अशी कशी घरात झाली बाई चोरी?
जरी ऐपत माझी नेली
विसरला इथेच तो अपुली
जरी येईल मागायासी
तरी देईन नच मी त्यासी
डांबीन इथे चौप्रहरी
करावी कशास असली चोरी?
गीत | - | नामदेव व्हटकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | गोविंद कुरवाळीकर |
गीत प्रकार | - | भावगीत |