A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अशी कशी ओढ बाई

बिगी बिगी बिगी चाल ग, बाई चाल ग मर्दिनी
वाट बघत असंल घरधनी न्याहरीच्या ग पाई
पायाम्होरं पळतंय मन, झाली त्याला घाई

अशी कशी ओढ बाई असं कसं वेड, विचारू कुणाला?
मनाला मनाला ग, मनाला मनाला !

प्रीतीनं हाक ही दिली, साद घातली
कुणाला कुणाला?
मनाला, मनाला ग, मनाला मनाला !

कळीला वारा फुंकर घाली झुळुझुळु का झुळुझुळु
अन्‌ पदर पाकळी उमलू लागे हळूहळू का हळूहळू
साजणा, सांग ना
ही किमया असते अशी जादु ही कशी, भुलविते मदनाला

खट्याळ पाणी गातंय्‌ गाणी गुणुगुणु का गुणुगुणू
अन्‌ लाटांच्या पायी पैंजण बोले रुणुझुणु का रुणुझुणू
सजणा, सांग ना
या नदीला सागर दिसं लागलं पिसं, खळखळत्या पाण्याला

 

Random song suggestion
  उषा मंगेशकर, सुरेश वाडकर