अशी सांज का
अशी सांज का रोज अलवार होते
उगा हालती काळजातील काटे
मना दूरचे दीप व्याकूळ करिती
कटू मागचे काही हृदयांत साठे
ऋतू प्रीतीचा आठवे याच वेळी
सुके वाळले रान डोळ्यांत दाटे
अशा पारदर्शी क्षणाला, निखळती-
पुढे ओढलेले सुखाचे मुखोटे
उगा हालती काळजातील काटे
मना दूरचे दीप व्याकूळ करिती
कटू मागचे काही हृदयांत साठे
ऋतू प्रीतीचा आठवे याच वेळी
सुके वाळले रान डोळ्यांत दाटे
अशा पारदर्शी क्षणाला, निखळती-
पुढे ओढलेले सुखाचे मुखोटे
गीत | - | विजया जहागिरदार |
संगीत | - | बाळ बर्वे |
स्वर | - | देवकी पंडित |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • दूरदर्शन कार्यक्रम 'शब्दांच्या पलीकडले'साठी. |