A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अवचिता परिमळू

अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ।
मी ह्मणु गोपाळू, आला गे माये ॥१॥

चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥

तो सावळा सुंदरू कांसे पीताम्बरू ।
लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥

बोधुनी ठेलें मन तव जालें आन ।
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥

बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।
तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥
गीत - संत ज्ञानेश्वर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वराविष्कार- लता मंगेशकर
किशोरी आमोणकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - संतवाणी
  
टीप -
• स्वर- पं. हृदयनाथ मंगेशकर, संगीत- लता मंगेशकर.
• स्वर- किशोरी आमोणकर, संगीत- किशोरी आमोणकर.
अळुमाळू - अल्प.
आन - श्वासोच्छ्वास / जगणे.
कांस - कंबर.
ठक - भूल / स्तंभन / थक्क.
ठेला - उभा राहिलेला / कुंठित.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  लता मंगेशकर
  किशोरी आमोणकर