A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अय्याबाई इश्श्बाई

अय्याबाई ! इश्श्बाई ! सांगू काय पुढे?
गुलाबाचा रंग माझ्या गालावर चढे

काहीतरी झाले आहे, कोणीतरी आले आहे
त्याचे हसू गोड आहे, मला त्याची ओढ आहे
मला त्याची ओढ आहे, त्याचीमाझी जोड आहे
सांगताना बोल बाई ओठांवर अडे !

माझ्यापाशी झेप आहे, त्याच्या डोळ्यांत झोप आहे
माझ्यापाशी वाण नाही, त्याच्यापाशी जाण नाही
त्याच्यापाशी जाण नाही, साहसाचे त्राण नाही
काय सांगू? भलतेच वेड मला जडे !

माझे मन गात आहे, त्याच्या हाती साथ आहे
माझ्या पायी चाल आहे, त्याच्या हाती ताल आहे
त्याच्या हाती ताल आहे, अश्शी काही धमाल आहे
त्याच्या मनाआड जाऊन माझे मन दडे !

माझ्या शेजारी तो आहे, त्याच्या शेजारी मी आहे
त्याला काही मागायचे आहे, मला काही द्यायचे आहे
मला काही द्यायचे आहे, दोघांना काही प्यायचे आहे
आधी कोणी बोलावे हे जरा कोडे पडे !