A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बाळ जा मज बोलवेना

बाळ जा ! मज बोलवेना ! दाटला आता गळा
तू रहा सौख्यात बाळे ! अश्रु ढाळू दे मला

मीच कन्‍यादान केले करुनी मोठा सोहळा
सासरी निघता परि तू, ऊर माझा भंगला
ना कुणा कळतील माझ्या वेदनेच्या या कळा

पूस डोळे ! बंध तुटले येथले सारे अता
राहू दे वैराण गेही यापुढे मज एकटा
हो सदा सौभाग्यलक्ष्मी ! पुण्य माझे घे तुला
गेह - घर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.