A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बघा ना छळतो हा

बघा ना छळतो हा, छळतो हा वारा असा?
ओढुनी अंचल हा, अंचल हा पळतो असा!

आळ वृथा का या वार्‍यावर, वार्‍याहुन मन चंचल, आवर!
कशी आवरु हलता झुलता तव नयनांचा आरसा!

इथेच झाले नील जलावर, स्वर्ग-धरेचे मीलन सुंदर
प्रतिबिंबाला बिंब पाहता वेडावुनी मज राजसा!

भावमधूर ही फुले मनोहर, बहरून आली पर्णपाचूवर
सहवासाचा सुगंध अपुला परिमळ तो हा गोडसा!

 

  आशा भोसले, दशरथ पुजारी