बघुन बघुन वाट तुझी
बघुन बघुन वाट तुझी नयन थांबले
परत निघुन जावया न वळती पाऊले
भिरभिरता तळी वारा
लुकलुकत्या वर तारा
क्षण क्षण मी गणत इथे स्तब्ध राहिले
भास तरी किती वेळा
सोडी ना मन चाळा
पदरव मज वाटे जरी पान वाजले
मनी येते रे नाथा
येशिल तू मी जाता
सोसशील दु:ख कसे मज न सोसले
परत निघुन जावया न वळती पाऊले
भिरभिरता तळी वारा
लुकलुकत्या वर तारा
क्षण क्षण मी गणत इथे स्तब्ध राहिले
भास तरी किती वेळा
सोडी ना मन चाळा
पदरव मज वाटे जरी पान वाजले
मनी येते रे नाथा
येशिल तू मी जाता
सोसशील दु:ख कसे मज न सोसले
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | माझं घर माझी माणसं |
गीत प्रकार | - | चित्रगीत, नयनांच्या कोंदणी |
रव | - | आवाज. |