A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बाई बाई मनमोराचा

बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला

चिमणी मैना चिमणा रावा
चिमण्या अंगणी चिमणा चांदवा
चिमणी जोडी चिमणी गोडी
चोच लाविते चिमण्या चार्‍याला
चिमणं चिमणं घरटं बांधलं चिमण्या मैनेला

शिलेदार घरधनी माझा
थोर मला राजांचा राजा
भोळाभोळा जीव माझा जडला त्याच्या पायाला

रे मनमोरा रंगपिसारा, अंगी रंगुनी जीव रंगला
गोजिरवाणी मंजुळ गाणी, वाजविते बासुरी डाळिंब ओठाला
येडंयेडं मन येडं झालं ऐकुन गानाला
रावा - पोपट.
शिलेदार - स्वत:चा घोडा घेऊन सरकारची नौकरी करणारा राऊत (घोडेस्वार).

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.