बाई माझी करंगळी मोडली
ऐन दुपारी यमुनातीरी, खोडी कुणी काढली
बाई माझी करंगळी मोडली
जळी वाकुन मी घट भरताना
कुठून अचानक आला कान्हा
गुपचूप येऊन पाठीमागून माझी वेणी ओढली
समोर ठाके उभा आडवा
हातच धरला माझा उजवा
मीही चिडले ईरेस पडले, वनमाला तोडली
बाई माझी करंगळी मोडली
जळी वाकुन मी घट भरताना
कुठून अचानक आला कान्हा
गुपचूप येऊन पाठीमागून माझी वेणी ओढली
समोर ठाके उभा आडवा
हातच धरला माझा उजवा
मीही चिडले ईरेस पडले, वनमाला तोडली
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | पडछाया |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर, लावणी |
ईर | - | शक्ती / जोर / चुरस / ईर्ष्या. (ईरेस पडणे- चुरस लावून पुडे सरसावणे.) |
ठाकणे, ठाके | - | थांबणे / स्थिर होणे. |