बाई मी मुलखाची लाजरी
कोल्हापूरचा नखरा माझा
चालणं ग सातारी
अहो खानदेशी नार लई लई, बाई मी मुलखाची लाजरी
माझा राया गेलाय् दूर
लागे माझ्या जिवाला घोर
जशी पाण्यावीन सुकून जाते भरलेली बाजरी
ही जखम कुणाला सांगा मी दाखवू
प्रेमानं आता मी कुणावरी रागवू
कुणी मला द्या धीर आता हो झाले मी बावरी
मी आज सजीन हो सोळा सिणगाराने
अन् घास देईन मी लाजून हो प्रेमाने
आज राया परतून येती निरोप आलासा घरी
चालणं ग सातारी
अहो खानदेशी नार लई लई, बाई मी मुलखाची लाजरी
माझा राया गेलाय् दूर
लागे माझ्या जिवाला घोर
जशी पाण्यावीन सुकून जाते भरलेली बाजरी
ही जखम कुणाला सांगा मी दाखवू
प्रेमानं आता मी कुणावरी रागवू
कुणी मला द्या धीर आता हो झाले मी बावरी
मी आज सजीन हो सोळा सिणगाराने
अन् घास देईन मी लाजून हो प्रेमाने
आज राया परतून येती निरोप आलासा घरी
गीत | - | देवकीनंदन सारस्वत |
संगीत | - | विठ्ठल शिंदे |
स्वर | - | सुलोचना चव्हाण |
गीत प्रकार | - | लावणी |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.