A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हिल हिल पोरी हिला

हिल हिल पोरी हिला, तुजे कप्पालिला टिला
तुजे कप्पालिला टिला, गो फॅशन मराठी सोभंय तुला

आरं जा जा तू मुला का सत्तावितंय मला
का सत्तावितंय मला न जाऊन सांगेन मी बापाला

धाकू पाटलाची पोर मी बेरकी, अशी किती पोरं तुझ्यासारखी
आरं जेवण करायला पाणी भरायला ठेवलीन्‌ घरकामाला

तुझी फॅशन अशी रे कशी, लांब कल्ले तोंडात मिशी
तू डोळ्यानं चकणा, दिसं नाही देखणा, चल जा हो बाजूला

तुझा पदर वार्‍याशी उडतो, अगं बगून जीव धारधारतो
तुझी नखर्‍याची चाल करी जीवाचं हाल माझे गुल्लाबाचे फुला
दादा कोंडकेच्याबरोबर काम करताना मला एका विचित्र अडचणीला तोड द्यावे लागे. दादांनी लिहिलेली गीते दादा त्यांच्या चालीसह म्हणून दाखवीत. पण त्यांची प्रत्येक चाल 'काय ग सखू'च्या चालीसारखी असे. त्यामुळे त्यांच्या डोक्यातली ती चाल काढून त्या जागी माझी चाल त्यांना पसंत करायला लावायची, म्हणजे माझी परीक्षाच असे.

'आंधळा मारतो डोळा'ची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. चित्रपटाबरोबरच ध्वनिमुद्रिकांच्या विक्रीने दादांना प्रचंड रॉयल्टी मिळवून दिली.

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

 

  उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी