बाई या पावसानं
बाई या पावसानं
लाविली झीम झीम
भिजविलं माळरानं
उदासलं मन
बाई या पावसानं
दिनभर देई ठाणं
रात्रिस बरसून
सकाळिचं लोपविलं
कोवळं ऊन छान
बाई या पावसानं
फुलली ही जाईजुइ
बहरुनी वाया जाई
पारिजातकाची बाई
कशी केली दैन
मातींत पखरण
बाई या पावसानं !
नदीनाले एक झाले
पूर भरूनीया चाले
जिवलग कोठें बाई
पडे अडकून
नच पडे चैन
बाई या पावसानं
लाविली झीम झीम
भिजविलं माळरानं
उदासलं मन
बाई या पावसानं
दिनभर देई ठाणं
रात्रिस बरसून
सकाळिचं लोपविलं
कोवळं ऊन छान
बाई या पावसानं
फुलली ही जाईजुइ
बहरुनी वाया जाई
पारिजातकाची बाई
कशी केली दैन
मातींत पखरण
बाई या पावसानं !
नदीनाले एक झाले
पूर भरूनीया चाले
जिवलग कोठें बाई
पडे अडकून
नच पडे चैन
बाई या पावसानं
गीत | - | कवी अनिल |
संगीत | - | जी. एन्. जोशी |
स्वर | - | पु. ल. देशपांडे |
गीत प्रकार | - | ऋतू बरवा, भावगीत |
टीप - • काव्य रचना - ऑगस्ट १९३२, नागपूर. |
पखरण | - | सडा / उधळण. |