A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मधुसूदना हे माधवा

मधुसूदना हे माधवा । हे चक्रपाणी सुरम्य सुदर्शन ।
सूर्य-सुधाकर-लोचना ॥

वसना विणोनी शिणल्या सुरामा ।
सति रुक्मिणी ही तशी सत्यभामा ।
तव सिद्ध जाया मम रक्षणा ।
वैरी करिल तरि कृष्ण वदना ॥
चक्रपाणि(णी) - हातात सुदर्शनचक्र असलेला- विष्णू / विष्णूचा आठवा अवतार- कृष्ण.
वसन - वस्‍त्र.
सुधाकर - चंद्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.