बैल तुझे हरणावाणी
बैल तुझे हरणावाणी, गाडीवान दादा
तरुण माणसाच्या मनीचा जाण तू इरादा
वाट नागमोडी वेडी
तुझी फुलोर्याची जोडी
ऊन सावल्यांचा झाला आगळा कशिदा
गाव साजणीचा दूर
शहारून येतो ऊर
सूर तिच्या लावण्याचे घालतात सादा
परत साद देण्यासाठी
शीळ येऊ पाहे ओठी
पलीकडे खेड्यामाजी वसे एक राधा
स्वप्नभारल्या एकान्ती
तिचा हात यावा हाती
झणि भेटवी रे मित्रा, राधिका मुकुंदा
तरुण माणसाच्या मनीचा जाण तू इरादा
वाट नागमोडी वेडी
तुझी फुलोर्याची जोडी
ऊन सावल्यांचा झाला आगळा कशिदा
गाव साजणीचा दूर
शहारून येतो ऊर
सूर तिच्या लावण्याचे घालतात सादा
परत साद देण्यासाठी
शीळ येऊ पाहे ओठी
पलीकडे खेड्यामाजी वसे एक राधा
स्वप्नभारल्या एकान्ती
तिचा हात यावा हाती
झणि भेटवी रे मित्रा, राधिका मुकुंदा
| गीत | - | ग. दि. माडगूळकर |
| संगीत | - | सुधीर फडके |
| स्वर | - | आशा भोसले |
| चित्रपट | - | प्रपंच |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
| आगळा | - | अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण. |
| कशिदा | - | वस्त्रावर केलेले वेलबुट्टीचे नक्षीकाम. |
| झणी | - | अविलंब. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












आशा भोसले