A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बाजार फुलांचा भरला

बाजार फुलांचा भरला, मज तुळस दिसेना
ही प्रीत जगाची खोटी, मज बहीण मिळेना

मज एक हवी ती माया, वणवणतो फिरतो वाया
मी कुठवर चालत राहू, का मार्ग सरेना
मज बहीण मिळेना

हातात फुलांचा गजरा, वखवखल्या कामुक नजरा
या दलदल चिखलामधुनी का कमळ फुलेना
मज बहीण मिळेना

का आज तमाशा बघता? उघड्यावर अब्रू विकता
का किडे होऊन जगता, का जगता जगता मरता
या जगण्या-मरण्या मधला मज अर्थ कळेना
मज बहीण मिळेना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.