बकुळफुला कधीची तुला
          सात जन्मांची निनावी आशा धरून मनात
बकुळफुला कधीची तुला धुंडते बनात
टाकून दूर नदीच्या पार
उघडे माझ्या घराचे दार
सदैव पीशी हिंडते अशी नि:संगपणात
टाकून सारा शृंगारसाज
तुझ्याचसाठी फिरते आज
होईल कसे? झाले रे हसे सगळ्या जनांत !
श्रावणघनगर्जन वाजे
दिपव दोन्ही नयन माझे
एका आंधळ्या गहन निळ्या सोनेरी क्षणांत
          बकुळफुला कधीची तुला धुंडते बनात
टाकून दूर नदीच्या पार
उघडे माझ्या घराचे दार
सदैव पीशी हिंडते अशी नि:संगपणात
टाकून सारा शृंगारसाज
तुझ्याचसाठी फिरते आज
होईल कसे? झाले रे हसे सगळ्या जनांत !
श्रावणघनगर्जन वाजे
दिपव दोन्ही नयन माझे
एका आंधळ्या गहन निळ्या सोनेरी क्षणांत
| गीत | - | ना. घ. देशपांडे | 
| संगीत | - | यशवंत देव | 
| स्वर | - | मंगला नाथ | 
| गीत प्रकार | - | भावगीत | 
| पिसे | - | वेड. | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
  
  
  
  
  
  
  
  
  
  











 मंगला नाथ