बेभान या रात्री
बेभान या रात्री बेबंद झाले रे
अधीर मी अन् अधीर तूही, अधीर हे वारे
दोन हातांच्या झुल्यावर अंग झोकीन मी
अमृताचे दान घेता तृप्त होईन मी
मीलनाला साक्ष देतील लक्ष हे तारे
चांदण्यांचा धुंद मेळा नाचतो गगनी
गंध शोधीत भृंगही आले पहा रानी
स्पंदनांनी ऊर भरला कहर झाला रे
अधीर मी अन् अधीर तूही, अधीर हे वारे
दोन हातांच्या झुल्यावर अंग झोकीन मी
अमृताचे दान घेता तृप्त होईन मी
मीलनाला साक्ष देतील लक्ष हे तारे
चांदण्यांचा धुंद मेळा नाचतो गगनी
गंध शोधीत भृंगही आले पहा रानी
स्पंदनांनी ऊर भरला कहर झाला रे
गीत | - | यशवंत देव |
संगीत | - | अनिल-अरुण |
स्वर | - | अनुराधा पौडवाल |
गीत प्रकार | - | भावगीत |