भक्तीच्या फुलांचा बोलतो
भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास
तुझा देव येतो तुला भेटण्यास
चंदनाचा देह उटी उगाळीत
प्राणदीप माझा लावी फुलवात
धूप जाळी देवा अंतरीचा ध्यास
देवा तुझ्यावरी जीवफूल वाही
नामाची तुझिया आरती मी गाई
ध्यानमग्न होता याहो सावकाश
पडता घरात देवाचे पाऊल
जाहले घराचे मंगल देऊळ
नित्य घडो देवा तुझा सहवास
तुझा देव येतो तुला भेटण्यास
चंदनाचा देह उटी उगाळीत
प्राणदीप माझा लावी फुलवात
धूप जाळी देवा अंतरीचा ध्यास
देवा तुझ्यावरी जीवफूल वाही
नामाची तुझिया आरती मी गाई
ध्यानमग्न होता याहो सावकाश
पडता घरात देवाचे पाऊल
जाहले घराचे मंगल देऊळ
नित्य घडो देवा तुझा सहवास
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | आई कुणा म्हणू मी ? |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, चित्रगीत |