A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मनाप्रमाणे जगावयाचे

मनाप्रमाणे जगावयाचे कितीकिती छान बेत होते !
कुठेतरी मी उभाच होतो.. कुठेतरी दैव नेत होते !

कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना..
करू तरी काय? हाय, तेव्हा खरेच डोळे नशेत होते !

जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते ! मजेत होते !

बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते !
गीत - सुरेश भट
संगीत - माधव भागवत
स्वर- माधव भागवत
अल्बम - कैफियत
गीत प्रकार - मना तुझे मनोगत, कविता

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.