A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भरे मनात सुंदरा

भरे मनात सुंदरा, तुझीच मूर्ति श्यामला
छंद लागला जिवास, धुंद जो करी मला

कोकिळेस लाभली सुरम्य गीत-माधुरी
गौरगाल भूषवी सुरेख तीळ साजिरा

लाभता तुझ्यापरी सुकांत कृष्ण-सुंदरी
म्हणेन मी नको मला, अप्सरा मनोहरा

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.