A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ग बाई बाई झोंबतो गारवा

चंदनाच्या पलंगी शेज मखमली लाल
दोन उशा रेशमी, गरम लोकरी शाल
पर झोप नाही आली, जागरण झालं काल
रंगमहाली ऊब असून का काटा फुलतो नवा?
ग बाई बाई झोंबतो गारवा !

अंग नाजूक ग मला रुतली उशी
आली जांभई ग निजले बदलून कुशी
खिडकीमधुनी खुणवत होता चवथीचा चांदवा !

रागारागानं मी गेले कोन्यात ग
चिंब न्हाऊन मी पाहिलं ऐन्यात ग
मनात माझ्या घुमु लागला मदनाचा पारवा !

आज आला तुम्ही, माझी केली कदर
झाली नजरानजर, घेते लाजून पदर
खुशाल यावं जवळ घ्यावं, धरून हात आडवा !
पारवा - कबुतराची एक जात किंवा त्याच्या रंगाचा.
शेज - अंथरूण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.