भावफुलांची बाग सखये
भावफुलांची बाग सखये कशी फुलली
आज कशी रे भुंग्याला या कळी भुलली, कळी भुलली
हा धुंद वारा खट्याळ भारी
मिठीत मिटली दौलत सारी
भ्रमर फुलांचे चुंबन घेई
खर्या सुखाची ओळख पटली, ओळख पटली
धरती ल्याली हिरवा शालू
हिरवळीत चल जाऊन बोलू
प्रणय सुखाने नको बावरू
मनात माझ्या हुरहूर उठली, का उठली
साथ आपली तरुणपणाची
प्रीतीला या भिती कुणाची
तुझे नि माझे मीलन होता
मलाच माझी लाज वाटली, लाज वाटली
आज कशी रे भुंग्याला या कळी भुलली, कळी भुलली
हा धुंद वारा खट्याळ भारी
मिठीत मिटली दौलत सारी
भ्रमर फुलांचे चुंबन घेई
खर्या सुखाची ओळख पटली, ओळख पटली
धरती ल्याली हिरवा शालू
हिरवळीत चल जाऊन बोलू
प्रणय सुखाने नको बावरू
मनात माझ्या हुरहूर उठली, का उठली
साथ आपली तरुणपणाची
प्रीतीला या भिती कुणाची
तुझे नि माझे मीलन होता
मलाच माझी लाज वाटली, लाज वाटली
गीत | - | मा. दा. देवकाते |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वर | - | सुरेश वाडकर, आशा भोसले |
चित्रपट | - | दैवत |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |