A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भाव तोंचि देव

भाव तोंचि देव भाव तोंचि देव ।
ये अर्थी संदेह धरूं नका ॥१॥

भाव भक्ति फळे भावें देव मिळे ।
निजभावें सोहाळे स्वानंदाचे ॥२॥

भावचि कारण भावचि कारण ।
यापरतें साधन नाहीं नाहीं ॥३॥

एका जनार्दनीं भावाच्या आवडी ।
मनोरथ कोडी पुरती तेथें ॥४॥
रचना-संत एकनाथ
संगीत - मा. कृष्णराव
स्वराविष्कार - बालगंधर्व
मा. कृष्णराव
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
चित्रपट- धर्मात्‍मा
गीत प्रकार - चित्रगीत संतवाणी
  
टीप -
• स्वर- बालगंधर्व, चित्रपट- धर्मात्मा.