भावनांची वादळें उठली
भावनांची वादळें उठली अचानक
छेडताना तार ही तुटली अचानक.
दृष्ट कोणी लावली स्वप्नांस माझ्या
उमलण्याआधीं कळी सुकली अचानक.
वादळें बैचेन आणि अस्वस्थ लाटा
कोणती नौका अशी बुडली अचानक.
पहुडलो होतो चितेवरती 'इलाही'
बहरल्या ज्वाळांत ती दिसली अचानक.
छेडताना तार ही तुटली अचानक.
दृष्ट कोणी लावली स्वप्नांस माझ्या
उमलण्याआधीं कळी सुकली अचानक.
वादळें बैचेन आणि अस्वस्थ लाटा
कोणती नौका अशी बुडली अचानक.
पहुडलो होतो चितेवरती 'इलाही'
बहरल्या ज्वाळांत ती दिसली अचानक.
गीत | - | इलाही जमादार |
संगीत | - | भीमराव पांचाळे |
स्वर | - | भीमराव पांचाळे |
गीत प्रकार | - | कविता |