दुःख ना आनंदही अन्
दुःख ना आनंदही अन् अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन् आजही.
मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हें की बिंब माझें, मी न माझा आरसा.
याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन् घड्याच्या भोवती.
सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.
नाव आहे चाललेली कालही अन् आजही.
मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हें की बिंब माझें, मी न माझा आरसा.
याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन् घड्याच्या भोवती.
सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.
गीत | - | आरती प्रभू |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
अल्बम | - | मैत्र जीवाचे |
गीत प्रकार | - | भावगीत |