भेट ती झाली तुझी अन्
भेट ती झाली तुझी अन् गंधता आली जीवा
फूल मी झाले कळीचे, धुंदली सारी हवा
लाजते माझी मला मी, चालणे मंदावले
प्रीतीच्या गंगाजळाने मी सुखाने नाहले
मंदिरी माझ्या मनाच्या लाविला रे तू दिवा
रंगते लाली कपोली भाववीणा आडवी
मीलनाच्या इभ्रतीला ये गुलाबी पालवी
भेटणे स्वप्नी तुला रे छंद हा लागे नवा
फूल मी झाले कळीचे, धुंदली सारी हवा
लाजते माझी मला मी, चालणे मंदावले
प्रीतीच्या गंगाजळाने मी सुखाने नाहले
मंदिरी माझ्या मनाच्या लाविला रे तू दिवा
रंगते लाली कपोली भाववीणा आडवी
मीलनाच्या इभ्रतीला ये गुलाबी पालवी
भेटणे स्वप्नी तुला रे छंद हा लागे नवा
| गीत | - | उमाकांत काणेकर |
| संगीत | - | श्रीकांत ठाकरे |
| स्वर | - | दिलराज कौर |
| गीत प्रकार | - | भावगीत |
| कपोल | - | गाल. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












दिलराज कौर