भुई भेगाळली खोल
भुई भेगाळली खोल वल्लं, र्हाईली न कुटं
पाल्यापाचोळयाचा जीव वहाटुळीशी घुस्मटं.
उभ्या धस्कटांचं रान, आयुष्याला भिंगुळवानं
मुक्या जात्याच्या पाळूशी ओवी गाते जिवातुन.
सये सुगरनी बाई, तुला कशी सांगू गोष्ट
दाट दु:खाचं गाठुडं शब्द उचलंना वटं.
माय सुगरनी बाई देई, घरट्याशी थारा
असं बेवारशी जिनं सोसवेना उन्हवारा.
पाल्यापाचोळयाचा जीव वहाटुळीशी घुस्मटं.
उभ्या धस्कटांचं रान, आयुष्याला भिंगुळवानं
मुक्या जात्याच्या पाळूशी ओवी गाते जिवातुन.
सये सुगरनी बाई, तुला कशी सांगू गोष्ट
दाट दु:खाचं गाठुडं शब्द उचलंना वटं.
माय सुगरनी बाई देई, घरट्याशी थारा
असं बेवारशी जिनं सोसवेना उन्हवारा.
गीत | - | ना. धों. महानोर |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | अंजली मराठे |
चित्रपट | - | दोघी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
धसकट | - | धस, कुसळ. |
पाळू | - | जात्याच्या तोंडाची उंच कड. |
भिंगुळवाणे | - | भयंकर, उदास. |
वहाटळ | - | वावटळ, चक्रवात. |