तुम्हांवर केली मी मर्जी
तुम्हांवर केली मी मर्जी बहाल
नका सोडुन जाऊ रंगमहाल
पापण्यांची तोरणं बांधुन डोळ्यांवरती
ही नजर उधळिते काळजातली पिरती
जवळी यावं मला पुसावं, गुपित माझं खुशाल
हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड
या बसा मंचकी सुटंल गुलाबी कोडं
विरह जाळिता मला, रात ही पसरी मायाजाल
लाडे-लाडे अदबिनं तुम्हा विनविते बाई
पिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायी
अशीच र्हावी रात साजणा, कधी न व्हावी सकाळ
नका सोडुन जाऊ रंगमहाल
पापण्यांची तोरणं बांधुन डोळ्यांवरती
ही नजर उधळिते काळजातली पिरती
जवळी यावं मला पुसावं, गुपित माझं खुशाल
हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड
या बसा मंचकी सुटंल गुलाबी कोडं
विरह जाळिता मला, रात ही पसरी मायाजाल
लाडे-लाडे अदबिनं तुम्हा विनविते बाई
पिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायी
अशीच र्हावी रात साजणा, कधी न व्हावी सकाळ
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | उषा मंगेशकर |
चित्रपट | - | पिंजरा |
राग | - | कालिंगडा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |