A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बोटीनं फिरवाल का

हाय पाण्यामंदी न्हाय पाह्यला कधी
किल्ला जंजिरा दाखवाल का?
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का?

नको मुंबई, नको पूना
आवं नको नको मला गोवा
किल्ला कुलाबा मला खंदेरी-हुन्देरी दावा
न्हावाशेवा खाडी, लेनी घारापुरी
शिवदर्शन घडवाल का?
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का?

वर्सावा, खारदांडा
अर्नाळा किल्ला तो पाहू
नायगाव, सातपाटी, डहाणुच्या खाडीनं जाऊ
लय दिसाची हाय, इच्छा मनाची बाय
माजी हौस पुरवाल का?
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का?

मी सोनी तुमची सोनी
मला प्रेमानं म्हणता हो राणी
डोळ्यानं पाहू द्या समुन्दराचं ते पाणी
सांगा जाणार कवा, मला नेणार कवा
आता तारीख ठरवाल का?
ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का?
गीत - एकनाथ माळी
संगीत - कृष्ण-कमल
स्वर- रेशमा सोनवणे
गीत प्रकार - कोळीगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.