A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चाळ माझ्या पायांत

चाळ माझ्या पायांत, पाय माझे तालात
नाचते मी तोर्‍यात मोरावाणी
काय तुझ्या मनात सांग माझ्या कानांत
गोड गोड गुपित तुझ्या मनी रे

डौल आला खांद्याला, बाक आला बांध्याला
हातांची झाली अशी नागफणी
रुसते मी मनात हसते गालांत
झुलते मी सुरांत रातराणी रे

नाजूक ओठांखाली
छोटीशी बाई करांगुली
लाजते मी मनात, कशी सांगू जनात
नांदू दोघं जशी राजा-राणी रे

रूप माझं चंद्राचं पहा लाख मोलाचं
चंद्राची कोर मी तारांगणी
लुकलुकत्या तार्‍यांत डुलते तोर्‍यात
शोभते शुक्राची मी चांदणी रे
गीत - कवी संजीव
संगीत - वसंतकुमार मोहिते
स्वर- आशा भोसले
चित्रपट - भाऊबीज
गीत प्रकार - चित्रगीत, लावणी

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.