चाल बैला चाल
चाल बैला चाल
गीत गाती रानपाखरं घुंगुर देती ताल
पहाट फुटता औतं जुपली, सकाळ आली आणिक गेली
बघता बघता दुपार निवली
गार वारा मावळतीचा सुखवी संध्याकाल
घटका येती घटका जाती, तुला मला ते काय माहिती
राबे त्याला लाभे शेती !
घाम गाळुनी सुगी साधता सुरू आपले साल
नंदी तू तर दूत शिवाचा, खांदां घेसी भार भवाचा
वंश थोर रे जगात तुमचा
गीता गाता कृष्ण स्वत:ला म्हणून म्हणे गोपाल

गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | कुबेराचं धन |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
निवणे | - | शांत होणे. |
भव | - | संसार. |