चल चल रे सजणा
चल चल रे सजणा गाऊया
प्रीतीफुलांनी न्हाऊया
येथे कुणी ना अशा सांजवेळी
वारा हळू हा साद घाली
वेलीवरी ऐसा आता
साज नवा आला नाथा
पानोपानी प्रेमगाणी वेचूया
लोचनांची वेडी भाषा
प्रीतिच्या युगाची आशा
रानीवनी मोहरुनी जाऊया
प्रीतीफुलांनी न्हाऊया
येथे कुणी ना अशा सांजवेळी
वारा हळू हा साद घाली
वेलीवरी ऐसा आता
साज नवा आला नाथा
पानोपानी प्रेमगाणी वेचूया
लोचनांची वेडी भाषा
प्रीतिच्या युगाची आशा
रानीवनी मोहरुनी जाऊया
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | राणी वर्मा |
गीत प्रकार | - | भावगीत |