चल रं शिरपा देवाची किरपा
चल रं शिरपा, देवाची किरपा झालीया औंदा छान रं छान
गाऊ मोटंवरचं गाणं
चल माज्या राजा, चल रं सर्जा बिगीबिगी, बिगीबिगी डौलानं डौलानं
गाऊ मोटंवरचं गाणं
मोट चालली मळ्यात माज्या चाक वाजतंय कुईकुई
पाटाचं पानी झुळझुळवानी फुलवित जातंय जाईजुई
धरतीमाता येईल आता नेसून हिरवं लेणं रं लेणं
गाऊ मोटंवरचं गाणं
गाजर मुळा नि केळी रताळी माघातला हरभरा
पडवळ काकडी वांगी वालपापडी मक्याचा डुलतोय तुरा
कोथमिर घेवडा सुवासी केवडा उसाचं लावलंय बेणं रं बेणं
गाऊ मोटंवरचं गाणं
उसाचं पीक आलंय जोसात औंदा
अरं देईल बरकत मिरची नी कांदा
वाटाणा भेंडी तेजीचा सौदा
खुशीत गातुया शेतकरी दादा
गव्हाची ओंबी वार्याशी झोंबी करतिया पिरमानं पिरमानं

गीत | - | दादा कोंडके |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | जयवंत कुलकर्णी |
चित्रपट | - | आंधळा मारतो डोळा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लोकगीत |
तरुवर | - | तरू / झाड. |
बेणें | - | बियाणं. |
मोट | - | विहिरीतून पाणी काढण्याचे मोठे पात्र. |