A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चल सर्जा चल राजा

चल सर्जा, चल राजा, बिगी बिगी बिगी जायाचं
बिन मोलाचं बिन तोलाचं सौंगडी शेतकर्‍याचं

माथ्यावरती दिवसाचा ये डोळा.. चल सर्जा
होय भुकेला शंभू हा, हाय भोळा.. चल राजा
भाकर कांदा, झुणका रांधा, पोट भरे रायाचं

उडेल फेटा पळसाच्या रंगाचा.. चल सर्जा
खण जरतारी आणिन मी भिंगाचा.. चल राजा
तुजवर माळा, घुंगुरवाळा, लेणं सौभाग्याचं

येईल आतां चांदोबा आभाळीं.. चल सर्जा
होइल वेडी पारंब्यांची जाळी.. चल राजा
कलत्या माना, डुलक्या घ्या ना, टकमक नच पाह्याचं
घुंगुरवाळा - घुंगरे लावलेला लहान मुलाच्या पायांतला पैंजण.